100 days TB campaign : १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन संपन्न -NNL
नांदेड| संपूर्ण भारतात आज रोजी निवडक ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेस सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
व्यासपीठावर सरपंच सौ मंदाकिनी यन्नावार उपसरपंच दत्ता कदम पोलीस पाटील वसंत पल्लेवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मोहिमेची सुरुवात ७ डिसेंबर २०२४ पासून झालेली असून २४ मार्च २०२५ रोजी याची सांगता होईल. सदर मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षय रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे ,क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे ,वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे, क्...
