Sunday, June 28

Tag: in the society and provide benefits

Mahesh Dhawale : समाजातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांना शोधून लाभ द्या – महेश ढवळे

Mahesh Dhawale : समाजातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांना शोधून लाभ द्या – महेश ढवळे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| समाजातील खऱ्या लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, जिल्ह्यातील दिव्यांग, तृतीयपंथी आदीची उपस्थिती होती. समाजातील खरे गरजू लाभार्थी ओळखून त्यांना लाभ मिळवून द्यावा. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे असे लोक लाभ घेत असतील तर अशा लोकांना शोधा त्यांच्यावर कारवाई करता येईल असेही अध्यक्ष श्री. ढवळे यांनी सांगितले. आज समाजातील वंचित घटकांचा शोध घेवून त्यांना लाभ देण्याची कार्यवाही केली यांचे समाधान व्यक्त करुन त्यांनी जिल्हा...
error: Content is protected !!