All wells in the district should be secured : जिल्ह्यातील सर्व विहीरींना एक महिन्याच्या आत सुरक्षा कठडे करावेत- जिल्हाधिकारी
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील कठडे नसलेल्या, एक किंवा दोन फुट उंच कठडा असलेल्या विहीर मालकांनी एक महिण्याच्या आत विहीरीला सुरक्षा कठडे करुन घ्यावेत. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51-ब नुसार संबंधित विहीर मालक कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 30 नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी मौ. आलेगांव ता. जि. नांदेड येथे एक ट्रॅक्टर ट्रॉली बिनकठड्याच्या विहीरीत पडल्यामुळे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून शेत मजूरीला जाणाऱ्या दहापैकी सात शेतमजूर महिलांना जीव गमवावा लागलेला आहे, असे प्रकार याअगोदर सुध्दा घडलेले आहेत. जीवीत जनावरांची हानी झालेली आहे. यापुढेही बिन कठड्याच्या विहिरीत जीवित जनावरे, अज्ञान बालके, वृध्द पडून मोठी दु...
