Dr. Rekhatai Chavan Gorlegaonkar : काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या मतदार संघातील गाव भेटीला उदंड प्रतिसाद -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून, दसऱ्यानंतर आचारसंहिता लागून निवडणुकीचा बिगुल वाजण्याची तर दिवाळीनंतर मतदान होईल अशी शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षाच्या पक्षश्रेष्टींकडून निवडून येणाऱ्या उमेदराच्या शोधात चाचपणी केली जात आहे. बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघांमध्ये कोणाला उमेदवारी दिली..? तर तो निवडून येऊ शकतो यासाठी थेट मतदारांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांची मत मतांतरे जाणून घेतली जात आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक महिन्यापासून डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी विधानसभा मतदार संघात गाव भेटीला सुरुवात केली असून, यास उदंड प्र...
