प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा समावेश निश्चित..NNL
मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए चे केंद्रात सरकार स्थापन होत असून उद्या रविवार दि.9 जून रोजी नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक साधणार आहेत. एन डी ए सरकार चे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची उद्या शपथ घेणार असून त्यांच्या समवेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) चे घटक दलाच्या ही निवडक नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे.
एन डी ए चे घटक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांचा सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला असून उद्या दि .9 जून रोजी ना.रामदास आठवले केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेऊन केंद्रीयमंत्री म्हणून हॅटट्रिक करणार आहेत.त्यामुळे देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील रिप...
