लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा डंका सर्वात जोरात वाजत होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तर ठाकरे यांच्या शिवसेनेने गद्दार, ५० खोके एकदम ओकेच्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ठाकरे यांच्या शिवसेनेलाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलटपक्षी त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. भाजपाचा पराभव झाला याच आनंदात असलेल्या ठाकरे गटाला या वास्तवाचे भान आहे की नाही माहिती नाही.
लोकसभा निवडणुकीत यावेळी सर्वाचे लक्ष लागले होते ते शिवसेनेकडे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामान्य नागरिक कोणाच्या बाजुने उभे राहतील याची उत्सुकता सर्वानाच होती. तथापि लोकसभा निवडणुकीचा सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे या निवडणुकीत नुकसान जास्त झाले. तसेच जो विजय मिळाला ...
