Praveen Patil Chikhlikar : कंधार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा – प्रवीण पाटील चिखलीकर
कंधार, सचिन मोरे| गत चार दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कंधार तालुक्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन, सदरच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करा! अशी मागणी कंधार तहसीलदाराकडे केली आहे.
अतिवृष्टीमुळे भिंत अंगावर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कोटबाजार येथील शेख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. नांदेड जिल्ह्यासह कंधार तालुक्यात गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी - नाल्याला पूर आला असून, तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
कंधार तालुक्यातील अनेक भागातील नदी - नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यां...
