Sunday, June 28

Tag: in Himayatnagar Nagar Panchayat election battle

Politics News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक रणसंग्रामात तणाव शिगेला

Politics News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक रणसंग्रामात तणाव शिगेला

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीला सुरुवात होताच राजकीय वातावरण तापले असून, आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांचे नेते मोहम्मद जावेद यांच्यात जोरदार तणाव निर्माण झाला. शहरातील 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असताना, नामांकन परत घेण्याच्या दिवशी वार्ड क्रमांक 9 मध्ये मोठा गोंधळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार पांचमासे यांना अर्ज मागे घ्यायला लावला असा आरोप होत असल्याने परिस्थिती चिघळली. ठाकरे व राष्ट्रवादी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, धक्काबुक्की व गदारोळ झाल्याचे चित्र तहसील कार्यालय परिसरात झाल्याचे पाहायला मिळाले. ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांमध्येही या घटनेची ...
error: Content is protected !!