Baliraja’s Pola celebrated : हिमायतनगर शहर व तालुक्यात बळीराजाचा पोळा अतिवृष्टीच्या – दुष्काळाच्या छायेतही उत्साहात साजरा
हिमायतनगर, अनिल मादसवार| अतिवृष्टीच्या संकटाने सर्व काही नष्ट होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही भारतीय परंपरेनुसार साजरा होणारा वृषभराजाचा पोळा हिमायतनगरात उत्साहात पार पडला. नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची मिरवणूक ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातुन काढण्यात आली.
शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावास्येनिमित्त पोळा सण पार पडला. सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना स्नान घालून रंगीबेरंगी सजावट केली होती. वार्निश, घुंगरमाळ, झुली, कासरे, गोंडे आदी सजावटींनी सजलेले बैल गावोगावी व शहरात आकर्षण ठरत होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने सडा-संमार्जन करून शेतीअवजारे आणि पळसाच्या मेढ्याची पूजा-अर्चना केली.
सायंकाळी 4 वाजता नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांनी मानाच्या बैलांची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात केली. जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराचे दर्शन घेत मिरवणूक श...

