Journalist Protection act : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार
नांदेड| राज्यात पत्रकार संरक्षण कायदा येत्या २६ नोव्हेंबर पूर्वी म्हणजेच संविधान दिनाच्या पूर्वी लागू करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कक्षासमोर आत्मदहन करू असा इशारा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनाही पाठविले आहे.
राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त , महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांचे पाठीराखे एस .एम. देशमुख यांनी तब्बल 40 वर्षे संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला परंतु...
