Friday, May 15

Tag: Implement Bhavantar Yojana in Maharashtra! Khat. Ashokrao Chavan’s big demand for farmers in Rajya Sabha

Mp Ashok Chavhan : महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा! खा. अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत मोठी मागणी

Mp Ashok Chavhan : महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा! खा. अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत मोठी मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड l शेतकऱ्यांच्या हितासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज राज्यसभेत केली. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे बाजारात शेतीमालाचे दर कोसळल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य आणि बाजारभाव यांतील फरकाची रक्कम थेट दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते. ही योजना देशभर तसेच महाराष्ट्रात राबविण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रासाठी, विशेषतः रेल्वे विकासासाठी, अभूतपूर्व ठरणारा असल्य...
error: Content is protected !!