Palaspur Sirpally road work will not be completed : साढेतीन वर्ष उलटून गेली तरी हिमायतनगर – पळसपूर सिरपल्ली रस्त्याचे काम पूर्ण होईना..! -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम प्रधानमंत्री सडक योजनेतून गेल्या साढेतिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम केवळ म्हणायलाच सुरू आहे. मात्र या रस्ता कामाला कुठलीच गती मिळत नसल्याने काम अजूनही थांबूनच आहे. रस्त्यावर गिट्टी व मुरूम अंतरून निवडणुकीपूर्वी ठेकेदाराने काम बंद केले आहे. त्यामुळे आजघडीला रस्त्यावरील गिट्टी उखडून मोकळी झाली असल्याने प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिमायतनगर, पळपसुर, डोल्हारी, ढाणकी भागातील नागरिक, शेतकरी व वाहनधारकातून केली आहे.
हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने तत्कालीन खासदार हेमंत पाटी...
