Sunday, June 28

Tag: Himayatnagar city flooded

Himayatnagar city flooded : विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर जलमय

Himayatnagar city flooded : विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर जलमय

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आभाळात अचानक विजांचा कडकडाट झाला आणि ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने शहर व परिसराचे जनजीवन विस्कळीत केले. नाल्यांना पूर आल्याने शहराच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले. बाजार चौक, सराफा लाईन, परमेश्वर कॉम्प्लेक्स, चौपाटी परिसरातील अनेक दुकाने पाण्यात गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वाहन धारकांना पाण्याच्या लोंढ्यातून गाड्या चालविणे कठीण झाले. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखालीच आहेत. सोयाबीन पिके काळवंडून सडली असून, कापसाच्या रोपांची पाने गळून पडल्याने यंदा शेतकऱ्यांच्या हाती काहीही येणार नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतांमधील बांध फुटल्याने खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्याची ...
error: Content is protected !!