Nanded ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान – ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी
नांदेड, अनिल मादसवार | गेल्या आठवडाभरात नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा जनसंपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी गुरे-वासरे वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
अशा स्थितीत शासनाने तात्काळ पावले उचलून पूरग्रस्त भागातील पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच समस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.
ही मागणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी विठ्ठल कल्याणकर (जिल्हाप्रमुख), प्रीतपाल सिंह शाहू (नांदेड महानगर प्रमुख), अनिल कदम (हदगाव तालुका प्रमुख) आणि दत्तराव देशमुख (...
