Municipal Disclosure : सीटूचा दणका क्षेत्रीय अधिकारी श्री संजय जाधव यांना कोणत्याही पदावर पदोन्नती दिली नाही -मनपाचा खुलासा -NNL
नांदेड| सीटू कामगार संघटनेने मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात पूरग्रस्तांचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने व तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशानुसार सादर केले आहेत. परंतु अत्यंत मुजोर असलेल्या मनपाच्या कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेशिस्तिचे दर्शन या वर्षी देखील घडविले.
झोन क्रमांक चार च्या लिपिकांनी अर्ज घेणार नाही अशी भूमिका घेतली ती बेकायदेशीर होती. त्या संदर्भात क्षेत्रीय अधिकारी श्री संजय जाधव यांच्याकडे सीटू च्या शिष्टमंडळाने अर्ज स्वीकारण्यात याव्यात अशी विनंती केली. त्या संदर्भाने श्री जाधव यांनी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता आवक जावक लिपिक व इतर उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समर्थन केले.
मनपाच्या सर्वच झोनच्या लिपिकांनी कमी अधिक प्रमाणात कायद्याची पायमल्ली केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. बोगस पूरग्रस्तांची ...
