Guardian Minister Girish Mahajan | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करुन घ्या – पालकमंत्री गिरीश महाजन – NNL
नांदेड| शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरु आहे. या योजनेत जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख अर्ज भरुन घेण्यात आले आहेत अजून उर्वरित पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पथदर्शी असून या योजनेसह अनेक योजना शासनाच्यावतीने नागरिकांसाठी राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमं...
