Girish Mahajan : शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन -NNL
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती आहे. लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदार संघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकर सारख...
