Governor C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दीक्षांत समारंभासाठी आगमन
नांदेड| राज्यपाल सी.पी राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नांदेड येथे आगमन झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभासाठी ते नांदेडला आले आहेत. सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर आगमन झाले.
यावेळी आमदार श्रीजया अशोक चव्हाण,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे आदी उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ दीक्षान्त समारंभ २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या ...

