Government Hospitals and Treatment : मराठवाड्यात शासकीय रुग्णालये व उपचार रामभरोसे -NNL
देवाचा प्रसाद ग्रहण करत असताना अगदी भक्तीभावाने घेतला जातो. तसेच डोळे बंद करून विश्वासाने गोळ्या औषधी ही खाण्यात येतात. देवाच्या प्रसादावर जेवढा विश्वास ठेवण्यात येतो , तेवढाच विश्वास डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांवर ठेवल्या जातो. परंतु जर गोळ्या - औषधीच बनावट असतील तर किंवा त्यामुळेच जीवाला धोका आहे, असे समजल्यावर त्या माणसांची काय अवस्था होईल ? याचा नुसता विचार जरी केला तरी जिवाचा थरकाप उडतो. मराठवाड्यातील बीड, नांदेड, धाराशिव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आले आहे.
मराठवाड्यातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधी व गोळ्यांचा पुरवठा करून रुग्णांसाठी त्याचा वापरही झाल्याचे उघडकीस आले आहे. नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून मे २०२३ मध्ये न्यूक्लास ६२५ या गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या गोळ्यांचा अहवाल ऑक्टोबर २०२४ म...
