Golden opportunity for journalists in digital media : डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी -NNL
पुणे| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने हे शिबीर डिजिटल मिडिया क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. अशा पध्दतीची कार्यशाळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने डिजिटल मिडियाच्या पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी केले आहे.
प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया नंतर आता डिजिटल मिडियाचं युग आलं आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर 5000 पेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स चालविले जातात. सुमारे 10,000 पेक्षा जास्त पत्रकार या प्लॅटफॉर्मवर काम करतात. मात्र पुरेशा तांत्रिक माहिती अभावी बहुतेकजण व्यावसायिकदृष्टया यशस्वी होताना दिसत नाह...
