Sunday, June 28

Tag: Give good morals to children before giving them a car – Rashtrasant Shri Lalitprabhji

Rashtrasant Shri Lalitprabhji ; मुलांना कार देण्यापूर्वी द्या चांगले संस्कार – राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

Rashtrasant Shri Lalitprabhji ; मुलांना कार देण्यापूर्वी द्या चांगले संस्कार – राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

धार्मिक, नांदेड
नांदेड । प.पू. राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी म.सा. म्हणाले की, जे पालक मुलांना फक्त जन्म देतात ते सामान्य, जे जन्मासोबत सुविधा व संपत्ती देतात ते मध्यम; पण जे मुलांना जन्म, संपत्ती आणि त्यासोबत उत्तम संस्कारही देतात तेच खरे श्रेष्ठ पालक होत. त्यांनी पालकांना आवाहन केले की मुलांना असे घडवा की, ते समाजाच्या अग्रस्थानी बसण्यास पात्र ठरतील आणि मुलांचे आचरण असे असावे की लोक पालकांना विचारू लागतील – “तुम्ही कोणते पुण्य केले की तुम्हाला अशी उत्तम संतती मिळाली?” ते म्हणाले की मुलांना फक्त शिक्षित न करता संस्कारित बनवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व जैन व राजस्थानी समाजतर्फे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, गुरु गोविंदसिंह स्टेडियमजवळ आयोजित जीवन जगण्याची कला या ३ दिवसीय विराट सत्संग–प्रवचन सोहळ्याच्या समारोप प्रसंगी ते ‘मुलांना कार देण्यापूर्वी द्या संस्कार’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की, ...
error: Content is protected !!