Chief Executive Officer Meenal Karanwal | बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन -NNL
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रथागत पद्धतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुके, हार, आणि शाल देण्याऐवजी शालेय साहित्य दिले जावे, ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होईल.
जिल्ह्यात दौरे करत असतांना ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची निकड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी बुके, हार-शालच्या सत्कारात बदल केला आहे. कार्यालय अथवा दौऱ्यात असतांना अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सत्कार करताना शालेय साहित्य द्यावे. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, तसेच इतर शैक्षणिक साधने असू शकतात, जी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सहाय्य करतील. एक वही अथवा एक पेन देखील दिला तरी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे स...
