A unique interpretation : विठ्ठल भक्तीच्या गितांचा अनोखा आविष्कार, कुसूम सभागृहात रंगला ‘गजर हरिनामाचा’
नांदेड| कलांगण प्रतिष्ठाण, श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र यांच्या संयुक्त सहकार्यातून काल राज्यातील व शहरातील दिग्गज कलावंतांनी आषाढी एकादशीनिमित्त एकापेक्षा एक सरस भक्तीगिते सादर करुन विठ्ठल भक्तीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी केले.
आषाढी एकादशीचे निमित्त साधून कलांगण प्रतिष्ठाण, श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र यांच्या सहकार्यातून कुसूम सभागृहात अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पना, निर्मिती व निवेदनातून गजर हरिनामाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या चैतन्य कुलकर्णीने, मुंबईच्या आसावरी जोशी (बोधनकर) या प्रख्यात गायकांनी दर्जेदार रचना सादर करुन रसिकांना विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध केले. सोबतच मराठवाड्याचा प्रख्यात गायक विलास गारोळे, गायिका सौ.रागिनी जोशी, उमेश मेगदे आणि विजय जोशी यांनी देखील जुन्...
