Saturday, June 27

Tag: Further work on Nanded-Latur direct railway line to accelerate soon! Information from Kha. Ashokrao Chavan

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. त्यांनी आज समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत हे सूतोवाच केले. सदर माहितीला मराठवाड्यासाठी आनंदाच्या बातमीची उपमा देत आपल्या पोस्टमध्ये खा. अशोकराव चव्हाण यांनी नमूद केले आहे की, नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती मिळणार असल्याचे शुभसंकेत आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यासंदर्भात माझी मागील काही महिन्यात अनेकदा चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर राज्यसभेतही मी हा विषय पुन्हा विस्तृतपणे मांडला. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला यश येत असून, प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार असल...
error: Content is protected !!