A fine : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाची तपासणी कारवाईत चालकांकडून 2 लाख 20 हजार रुपयाचा दंड वसूल
नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायुवेग पथकामार्फत 1 ते 22 जुलै 2025 कालावधीत नियमितपणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत आसन क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या एकूण 37 ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 20 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे.
या तपासणी मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या ऑटोरिक्षाची वैध कागदपत्रे व ऑटोरिक्षाची तपासणी करण्यात येते. तपासणी दरम्यान वैध कागदपत्रे सादर न करणाऱ्या, शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या, वैधपरवाना नसलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या, शालेय विद्यार्थ्याची रिक्षातून अवैध वाहतुक करणाऱ्...
