Sunday, June 28

Tag: from 01 to 04 October 2025

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १३:२२ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घ...
error: Content is protected !!