Saturday, June 27

Tag: found in quarry

Hadgaon crime news : वाळकी फाटा येथील खदानीत तहसीलच्या महिला कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

Hadgaon crime news : वाळकी फाटा येथील खदानीत तहसीलच्या महिला कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

क्राईम, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील वाळकी फाटा परिसरात केदारनाथ पेट्रोल पंपाच्या पाठीमागील दगडाच्या खदानीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव कमल क्षीरसागर (वय ५५) असून त्या हदगाव तहसील कार्यालयात चपराशी म्हणून कार्यरत होत्या. कमल क्षीरसागर या गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. आज सकाळी त्यांचा मृतदेह खदानीत आढळून आल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, मृतदेहावर काही जखमेच्या खुणा आढळून आल्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून, पो...
error: Content is protected !!