Former Speaker Sanjay Patil Karhale : सत्ताधारी भाजपाच्या मंडळींना अंतेश्वर बंधारा व शेतकऱ्यांचे काही देणे -घेणे नाही – माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे
लोहा| लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी अहमदपूर येथे नेण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री हे आग्रही आहेत प्रशासकीय पातळीवर तशी जोरदार तयारी सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी यास तीव्र विरोध दर्शविला असून, मंत्रालय पातळीपर्यंत आणि त्याही पुढे जाऊन या निर्णया विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय अंतेश्वर बंधारा कृती समितीने घेतला आहे. पण शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकीय हेतू समोर ठेवून पुन्हा समिती गठीत करणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या "बेगडी "पणा कळवळा जनतेला माहिती आहे त्यांना या प्रश्नाचे काहीच घेणेदेणे या शब्दात माजी शिक्षण सभापती व अंतेश्वर बंधारा सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी समाचार घेतला .
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून अहमदपुर तालुक्यात शेती सिंचनासाठी पाणी नेण्याचे वक्तव...
