Setback for Nanded Bjp । नांदेडात भाजपला पुन्हा एक धक्का; माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकरांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा -NNL
नांदेड। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादि काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पाटील यांच्यासोबतचे जुने सहकारी तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिट्टी दिली आहे. आपल्या सर्व पदांसह भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार खा. वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारूण पराभव केला. यानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या गटाकडून आरोप, प्रत्यारोप सुरू होऊन अस्थिरतेचे बातावरण निर्माण झाले आणि यातून भाजपच्या जेष्ठ नेत्या...
