Cyber awareness workshop for women : किनवट आदिवासी बहुल भागात महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न
नांदेड/किनवट| नांदेड पोलीस दलातर्फे मिशन समाधान अंतर्गत ग्रामीण भागातील आदिवासी महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन किनवट येथे करण्यात आले होते. यावेळी मिशन सहयोग च सुरुवात करण्यात आली.
पोलीस प्रशासन आणि समाज यांचा एक घनिष्ट संबध असतो. पोलीसांच्या कामकाज पध्दतीचा परिणाम समाजावर पडत असतो पोलीस प्रशासन 24X7 समाजासाठी कार्यरत असतात. अशा वेळी दैनंदिन कामकाजाशिवाय सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विधायक कार्य करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली 'मिशन सहयोग' ची सुरूवात करण्यात आली.
"मिशन सहयोग" अंतर्गत खालील 08 नाविन्यपूर्ण 1. ऑपरेशन बीट कनेक्ट, 2. मिशन उडान, 3. ऑपरेशन वारसा जतन, 4. नांदेड पोलीस लीग (NPL). 5. मिशन महिला सुरक्षा, 6. मिशन समाधान, 7. मिशन निर्धार, 8. मिशन एकता उपक्रमां पैकी "मिशन समाधान" अंतर्गत दिनांक 13.06.2025 रोजी नांदेड...
