Road stop movement : आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व आदिवासी समाजांच्या मूलभूत गरजा अशा विविध मागण्या घेऊन आदिवासी समाजाने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरून किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी जमातीत आरक्षण देण्याचा जीआर काढू असे आश्वासित केल्याने राज्यातील आदिवासी समाज आक्रमक झाला असून आदिवासी समाजाची आक्रमकता सर्व राज्यभरात पाहायला मिळत आहे. किनवट तालुक्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व आदिवासी समाजातील नेत्यांनी व आदिवासी नागरिकांनी आज एकत्र येत किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
हा रास्ता रोको आंदोलन तब्बल एक ते दीड तास सुरू असल्याने नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर व तेलंगणात ...
