Wednesday, May 13

Tag: for Scheduled Caste and Scheduled Tribe farmers

Micro irrigation scheme : अनु.जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना : तालुकास्तरावर विशेष मेळावा

Micro irrigation scheme : अनु.जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना : तालुकास्तरावर विशेष मेळावा

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड येथे कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनु.जाती व अनु.जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 15 ते 30 जून 2025 या पंधरवाड्यात विशेष मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठीबक व तुषार सिंचनाबाबत तालुका, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू नांदेड जिल...
error: Content is protected !!