infrastructure projects : काढणी पश्चात पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड| राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबीया सन 2025-26 योजनेंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा याघटकामध्ये तेल काढणी युनिट (१० टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) प्रकल्पाचा जिल्हास्तरावर एक लक्षांक प्राप्त आहे. तरी ईच्छुक व पात्र लाभार्थींनी काढणी पश्चात पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमारकळसाईत यांनी केले आहे.
यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लाख 90 हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. तेलबिया संकलन, तेल काढणे आणि तेल उत्पादन कार्यक्षमता वाढवण्यासाठी, सध्या कार्यरत पायाभूत सुविधांची क्षमता किंवा कार्यक्षमता सुधारण्यासह कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व कापूस बियाणे, नारळ, तांदूळ कोंडा तसेच वृ...
