Pandan road work under Rohyo ; रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी…. – NNL
उस्माननगर | येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सन. २०२३ - २०२४ मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्ते केलेल्या कामाचा तपशील मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक गोविंदराव पाटील काळम यांनी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा आधार घेऊन मा. गटविकास अधिकारी , पंचायत समिती कंधार , यांच्या कडे मागणी केली होती. पण यास कोणतेच ठोस पावले उचलली नसल्याने माहितीच्या अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवून काना डोळा केला असल्याचे बोलले जात आहे.
उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडून संन २०२३ ते २०२४ मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या पांदन रस्ते , १) तुकाराम वारकड ते गवळी खोपाडा , २) छगन सोनटक्के ते बालाजी घोरबांड , ३) बस स्टॉप ते लाठखुर्द या रस्त्याच्या कामावरील मजुरदाराचे ऑनलाईन पेमेंट यादी मिळणे , व अंदाज परिपत्रक ( ईस्टेमेट ) यांची मागणी जण माहिती अधिकारी तथा ग्रामविक...
