Infrastructure Projects of Maharashtra in the Union Budget | केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद – NNL
नवी दिल्ली| वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकलपाचे स्वागत केले असून, या प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. संसेदचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 22 जुलै पासून सुरू झाला आहे. वर्ष 2024-25 साठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या विकासासाठी व देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या विविध पायाभूत प्रकल्पांसाठी के...
