Friday, June 26

Tag: for flood-affected citizens

Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील मौजे नागनी येथील मांजरानदी पात्राचे पाणी गावात शिरून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनी गावातील महिला व नागरिक यांना कुंडलवाडी येथे के रामलू मंगल कार्यालय येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथे प्रशासनाच्यावतीने त्याच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच गावात पुराचे पाणी आले. अनेक नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. नांदेड येथील सीआरपीएफ च्या मदतीने नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील 80 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. मदतकार्य - नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन नेहमी दक्ष असून सतत तत्परतेने कार्यवाही करत आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी...
error: Content is protected !!