Centre of Excellence : भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार -NNL
नवी दिल्ली| भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यात केंद्राच्या उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरिता सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय ...
