पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी – NNL
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 पिक विमा पोर्टल चालू झालेले असून 15 जुलै 2024 पर्यत अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा/ पुनर्गठन करुन शासनाच्या एक रुपये पिक विमा योजनेत अधिक सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
पिक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करुन घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असेल तर, अशा शेतकऱ्यांचा विमा भर...
