दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL
नांदेड। माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे तत्कालीन सरपंच विमलबाई बळीराम पवार आणि ग्रामसेवक एल.एल.पपुलवाड यांनी संगणमताने कसल्याही प्रकारचे विकास कामे न करता ग्रामपंचायत दत्तमांजरी येथील १४ व्या वित्त आयोगातील निधी तेरा वेळा उचलून रक्कम हडप केली आहे.
त्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी असा लेखी अहवाल पंचायत समिती माहूरचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दि.८ऑगस्ट २०२२ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केला आहे. चौकशी अहवाल देवून दोन वर्ष झाली.
परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने दत्तमांजरी येथील माजी उप सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनोज किर्तने कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.१५ जुलै ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार...
