Pregnant deer hit : गाभण हरणाला अज्ञात वाहनाने उडविले; हरीण जागीच ठार तर पोटातील पाडस सुखरूप
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील घारापुर फाटा ते बोरी मार्गावर रस्ता पार करणाऱ्या एका गाभण हरिणीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याची घटना ०३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यात गाभण हरिणीचा जागीच मृत्यू झाला असला तरी पोटातील हरिणीचे पाडस सुखरूप बाहेर पडले आहे. हा प्रकार लक्षात येताच येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिले असून, मयत हरिणाच्या प्रेताची शासकीय नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली आहे.
सध्या हिमायतनगर शहर व तालुक्यात उष्णतेचा पारा ४३ अंशापेक्षा अधिक वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. घारापुर, हिमायतनगर, पळसपूर भागातील पैनगंगा नदी पात्रात आणि जंगलातील पाणवठ्याच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने मुकी जनावरे, पशु पक्षी आणि वन्य प्राणी पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करत आहेत. अश्याच प्रकारे पाण्याच्या शोधात रानोवन भटकंती करणारे एक गाभण ह...
