Snails and mealybugs attack soybean crops : हिमायतनगरात सोयाबीन पिकावर गोगलगाय, पैसा किडींचा हल्ला; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सोयाबीन पिकाची लागवड केल्यानंतर उगवण झाली आहे. सध्या पीक कोवळ्या स्थितीत असून गोगलगाय, पैसा, तेलनं या किडींनी हल्ला करण्यास सुरुवात केली असून, पहिल्यांदाच गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकऱ्यां समोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कोवळ्या पिकांना कसे वाचवायचे या विवंचनेने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची पिके वाऱ्यावर डोलू लागली आहेत. सध्याच्या स्थितीत पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू असून, त्यामुळे ढगाळ वातावरण असून, उष्णता वाढून जास्त प्रमाणात आद्रता निर्माण होत असल्याने गोगलगाय, पैसा, तेलनं या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडींच...
