Who is the mayor of Himayatnagar? : हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण? निकालाकडे सर्वांचे लक्ष
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. एकूण 82 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता शहराचा नगराध्यक्ष कोण होणार? (Who is the mayor of Himayatnagar?) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा, कम्युनिस्ट पक्ष तसेच अपक्ष अशा अनेक गटांचा त्रिकोणी नव्हे तर बहुकोनी सामना होत असून, निकाल अत्यंत रोमहर्षक आणि धक्कादायक ठरणार आहेत. मतदारांच्या चर्चेनुसार अनेक प्रभागात क्रॉस वोटींग झाली असून, याचा नेमका फायदा कुणाला..? होणार यावरहीं गप्पा रंगू लागल्या आहेत.
नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निकालात विलंब – उमेदवार नाराज
3 डिसेंबर रोजी निकालाला सुरुवात होणार होती. मात्र, नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना, कार्यकर्त्यांना...
