Everyone should take initiative for organ donation awareness : अवयवदान जनजागृतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी -NNL
नांदेड| अवयवदान किंवा अंगदान हा विषय फार महत्त्वाचा असून, अवयवदात्याच्या या सर्वश्रेष्ठ दानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते, त्यामुळे या कार्यात सर्वानी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
आज आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
देशात जगात आज अनेक रुग्ण अवयव प्रत्यापरोपणासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यांना जीवनदान देण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या मुत्यूपश्चातही आपण अवयवदान करुन समाजाच्या, इतराच्या का...
