Navratri festival ; शारदीय नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | साडेतीन शक्तीपीठ पैकी मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका माता गडावर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजेच दि.३ ऑक्टोबर ते १२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संस्थांचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली,तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावली, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव , गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,नं.पं.चे मुख्याधिकारी विवेक कांदे, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव ,बालाजी जगत, दुर्गादास भोपी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत यात्रेशी निगडित तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख आणि केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी संस्थांचे अध्यक्षा तथा जिल्हा ...
