Even before Rakshabandhan, put time on sister brother : मंगळवार ठरला घातवार; रक्षाबंधनापूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला -NNL
नांदेड| अवघ्या सात दिवसावर बहीण भावाचा रक्षाबंधन सण येऊन ठेपला असतांनाच बहिणीसह अन्य एका महिलेला घेऊन जाणाऱ्या भावाच्या दुचाकीं आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाल्याची घटना दिनांक १३ रोजी दुपारी हदगाव तालुक्यातील मौजे बामणी फाटा आणि शिबदरा जवळ घडली आहे. या दुर्घटनेत भाऊ खंडू डोके वय २५ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण अरुणा वागतकर वय २८ वर्ष हीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बहिणीची ननंद असलेली दुसरी महिला मृत्यूशी झुंज देत असून, या दुर्दैवी घटनेने हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी भोकर तालुक्यातील सम्दरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भोकर तालुक्यातील सम्दरवाडी येथील खंडू डोके वय २५ वर्ष हा युवक वारंगा परिसरातील आयुर्वेदिक वैद्याकडे मुळव्याधीचे औषध घेण्यासाठी आपली हिमायतनगर तालुक्यातील डोंगरदऱ्यात असलेल्या मौजे वाळकेवा...
