Establish cemeteries : बिलोली तालुक्यातील पुनर्वसित 35 गावांत स्मशानभूमी उभारा
नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात तब्बल 42 वर्षापूर्वी पुनर्वसन झालेल्या 35 पुनर्वसित गावांत स्मशानभूमीसाठी महसूल प्रशासनाने जमीन संपादित केली नाही . त्यामुळे बिलोली तालुक्यातील या 35 गावातील लोकांना अंत्यविधीसाठी चार-पाच किलोमिटर अंतरावरच्या जुन्या गावातील तत्कालीन स्मशान भूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. (Establish cemeteries in 35 rehabilitated villages in Biloli taluka) यासाठी चिखल पाण्यातून रस्ता काढत जावे लागत आहे. ग्रामस्थांना अनेक अडचणींना सहन कराव्या लागत आहेत.
तालुक्यातील टाकळी थडी, रामपूर थडी, कुंभारगाव ,केरूर, टाकळी खुर्द,व तळणी या सात गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृती कार्यक्रमात येथील स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचे आदेश असताना ही महसूल विभागाने अंमलबजावणी केली नाही. गोदावरी किनाऱ्यावरील चिरली, टाकळी थडी, कोळगाव, गुजरी कवठा, मा...
