Wednesday, May 13

Tag: Eligible farmers

Agriculture : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात भाग घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत

Agriculture : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात भाग घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत

कृषी, नांदेड
नांदेड| कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी 30 जुलै 2025 पूर्वी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत. तसेच अर्ज केलेले शेतकरी यांनी 4 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नांदेड येथे दुपारी 2 वाजता उपस्थित रहावे. प्राप्त अर्जातून जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. या आर्थिक वर्षात जिल्हास्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा किमान 1 महिला शेतकऱ्याची व किमान 1 राज्य तथा केंद्रीय शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीकस्पर्धा विजेते शेतकरी असे एकूण पाच शेतकऱ्याची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्याती...
error: Content is protected !!