Sunday, June 28

Tag: Educational literature distribution on the occasion of the death anniversary of Matoshree Late Rambai Gandapwad

Rambai Gandapwad ; मातोश्री कै. रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

Rambai Gandapwad ; मातोश्री कै. रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

करियर, नांदेड
मुखेड तालुक्यात सामाजिक जाणीवेतून सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या गंदपवाड परिवाराने यंदाही एक आगळीवेगळी परंपरा जपली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड व कृषी सहाय्यक नारायण गंदपवाड यांच्या मातोश्री कै. रामबाई मोगलाजी गंदपवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त वर्ग पहिली ते चौथीमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वही, पेन्स, पेन, पट्टी यांसह आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी साहित्याची मदत हा मोठा आधार असल्याने पालक व शिक्षकांकडून गंदपवाड परिवाराचे विशेष कौतुक झाले. गंदपवाड परिवार सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच विविध क्षेत्रात उपक्रम राबवत असतो. कधी वृक्षारोपण, कधी आरोग्य तपासणी शिबिरे तर कधी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा प्रकारे समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. ...
error: Content is protected !!