Dr. Shankarrao Chavan Government Medical College ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जलद कार्यवाहीमुळे वृद्धरुग्ण सुखरूप घरी रवाना
नांदेड| दिनांक 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेले वय 80 वर्षांपेक्षा जास्त असलेले प्रवृद्ध रामकिशन पांडे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मुलाकडे सुखरूप हस्तांतरित करण्यात आले. 19 नोव्हेंबर 2025 रोजी पायाला गंभीर जखम असलेल्या या अनोळखी वृद्धाला 108 रुग्णवाहिकेमार्फत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील शल्यचिकित्सा कक्ष क्रमांक 3 मध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी ते हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर तब्बल तीन दिवस पडून होते. स्टेशन मास्टर यांनी 108 ला कॉल करून माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णाची ओळख पटत नसल्याने त्यांची नोंद ‘अनोळखी रुग्ण’ म्हणून करण्यात आली. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) राजरत्न केळकर यांनी रुग्णाचा व्हिडिओ तयार करून जीवनज्योती फाउंडेशनचे दीपक पवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांच्या प...
