Tuesday, May 26

Tag: District Collector took note of Domple’s hunger strike

District Collector took note of Domple’s hunger strike : डोंपले यांच्या उपोषणाची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी दखल, “स्थिती जैसे थे” राहील याबाबत दक्षता घेण्याचे सिईओना दिले आदेश -NNL

District Collector took note of Domple’s hunger strike : डोंपले यांच्या उपोषणाची घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी दखल, “स्थिती जैसे थे” राहील याबाबत दक्षता घेण्याचे सिईओना दिले आदेश -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| तळणी पोस्ट लिंबगाव स्टेशन ता.जि.नांदेड येथील पीडित वयोवृद्ध कॉ.व्यंकटी डोंपले यांनी २ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुद्दत उपोषण सुरु केले होते. डोंपले यांचे घर गावातून उठविण्यासाठी गावातील सरपंच,ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व काही स्वतःला प्रतिष्ठित समजणारे गावातील नागरिक प्रयत्नशील होते. मागील ४० वर्षांपासून मातंग समाजाचे डोंपले यांचे कच्चे घर जिल्हा परिषद शाळेजवळ आहे. शाळेला कुंपन बांधकामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे ऐन आचारसंहिते मध्ये गरीबाचे घर कपाउंड मध्ये घेऊन त्यांना बेघर करण्याचा डाव अखण्यात आला आहे. यापूर्वी आचारसंहिते मध्ये पीडितांनी स्वगृही उपोषण केले आहे. कुणीही दखल घेत नसल्यामुळे त्यांनी सीटू कामगार संघटनेच्या नेत्यांची भेट घेऊन संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आणि प्रशासना विरुद्ध झुंज सुरु केली. १९ डिसेंबर रोजी सीटूच्या वतीने जिल...
error: Content is protected !!